एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. यात पगारवाढ (ST Employees Salary) आणि वेतनहमी हे दोन निर्णय अतिशय महत्त्वाचे आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या समीतीचा निर्णय येईपर्यंत विलिनीकरण करण्याचा निर्णय घेता येणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मात्र वाढ (ST Staff Salary Increase) करण्याचा अंतरिम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वेतनवाढ करण्यात येत असल्याचेही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले. जाणून घ्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे चालक ते लिपीक पदापर्यंतच्या एसटी कर्मचाऱ्यांचा किती वाढला पगार.
एसटी चालक पगारवाढ
नवनियुक्त चालक
सध्याचे स्थूल वेतन 17 हजार 395 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 7,200 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 24,595 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला चालक
सध्याचे स्थूल वेतन 23,040 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 5, 760 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 28, 800 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला चालक
सध्याचे स्थूल वेतन 37, 440 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारित स्थूल एकूण 41,040 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला चालक
सध्याचे स्थूल वेतन 53,280 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारीत स्थूल वेतन एकूण 56,880 रुपये. (हेही वाचा, MSRTC Strike: महामंडळ विलिनीकरण समितीच्या अहवालावर अवलंबून, मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय- अनिल परब)
एसटी वाहक पगार वाढ
नवनियुक्त वाहक
सध्याचे स्थूल वेतन 16,099 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 7,200 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 23,299 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला वाहक
सध्याचे स्थूल वेतन 21,600 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 5,760 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 27,360 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला वाहक
सध्याचे स्थूल वेतन 36,000 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 39,600 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला वाहक
सध्याचे स्थूल वेतन 51,880 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 55,440 रुपये.
यांत्रिकीची पगारवाढ
नवनियुक्त यांत्रिकी
सध्याचे स्थूल वेतन 16,099 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 7,200 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 23,299 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी
सध्याचे स्थूल वेतन 30,240 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 5,760 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 36,000 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी
सध्याचे स्थूल वेतन 44 ,496 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3, 600 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 48,096 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी
सध्याचे स्थूल वेतन 57,312 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3, 600 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 60, 912 रुपये.
लिपीकाची पगारवाढ
नवनियुक्त लिपीक
सध्याचे स्थूल वेतन 17,726 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 7, 200 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 24,926 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला लिपीक
सध्याचे स्थूल वेतन 24,768 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 5,760 रुपये. सुधारित स्थूल वेतन 30,528 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला लिपीक
सध्याचे स्थूल वेतन 38,160 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारित स्थूल वेतन 41,760 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला लिपीक
सध्याचे स्थूल वेतन 53,280 रुपये. राज्य सरकारने केलेली वाढ 3,600 रुपये. सुधारित स्थूल वेतन एकूण 56,880 रुपये.
कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अनिल परब यांचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय जाहीर करताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक गंभीर इशाराही दिला. अनिल परब यांनी इशारा देत सांगितले की, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अनुकूल निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनी उद्यापासून (25 नोव्हेंबर) कामावर हजर व्हावे. जे कर्मचारी मुंबईत आंदोलनात आहेत त्यांनी परवा सकाळपर्यंत कामावर हजर व्हावे. ज्यांचे निलंबन झाले आहे त्या कर्मचाऱ्याचे निलंबन ते कामावर हजर झाल्यावर मागे घेतले जाईल. इतके करुनही जे कर्मचारी कामावर हजर होणार नाही. त्यांच्यावर राज्य सरकार कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.