दोन दिवसांपूर्वीच राज्यातील महत्वाचा महामार्ग समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदीच्या हस्ते हा महामार्गाच्या पहिल्या टप्पायाचं उद्घाटन करण्यात आलं. तरी या नंतर आता सर्वसामान्यांसाठी नागपूर-शिर्डी मार्ग सुरु करण्यात आला आहे. पण या मार्गाची वेगमर्यादा, मार्ग, थांबा, रस्तादुभाजक बघता समृध्दी महामार्ग हा अतिवेगवान मार्गात मोडतो. मुळात कमी वेळात अधिक वेगाने लांबचं अंतर कापण्यासाठीच हा मार्ग तयार केला गेला आहे. तरी खासगी किंवा स्वतंत्र्य मालकी हक्काची, घरगूती वाहनांसाठी समृध्दी महामार्ग अधिक सोयिस्कर समजला जातो. पण आता या अतिवेगवान महामार्गावरुन लालपरी धावणार असल्याची माहिती मिळत आहे. किंबहुना या मार्गावरुन धावणाऱ्या काही विशेष बससेवा चालवण्यात येणार असल्याची एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
एस महामंडळाकडून साई भक्तांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नागपूर-शिर्डी ही बस नॉनस्टॉप बससेवा सुरु करण्यात येणार आहे. ही बस रोज रात्री ९ वाजता नागपूरच्या गणेशपेठ बसस्टॉपवरुन सुटणार असुन सकाळी साडेपाच वाजता शिर्डीला पोहचणार आहे. नागपूर शिर्डी ही बस येत्या दोन दिवसांत म्हणजे १५ डिसेंबरपासून सुरु होत आहे. तर ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना या बसची अर्धी तिकीट तर ७५ वर्षांवरील नागरीकांसाठी हा मोफत प्रवास असणार आहे. (हे ही वाचा:- Nagpur-Pune: आता नागपूर-पुणे प्रवास केवळ ६ तासांत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून राज्यातील नव्या महामार्गाची घोषणा)
तसेच समृध्दी महामार्गावरुन नागपूर औरंगाबाद ही नवी बस सुरु करण्यात येणार आहे. पुर्वी एसटी बसने नागपूर-औरंगाबाद अंतर कापण्यासाठी जवळपास १३ तास लागायचे पण आता हा प्रवास केवळ सहा ते सात तासांत पुर्ण होणार आहे. ही बसदेखील १५ डिसेंबर पासून सुरु होणार असुन या बसचा वेळ काय असेल या बाबत महामंडळाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.