तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृध्दी महामार्गाचा आज लोकार्पण सोहळा पार पडल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. सध्या नागपूर ते शिर्डी दरम्यान हा महामार्ग सुरु करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती दर्शवली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील एका नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. तरी या नव्या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे प्रवास केवळ सहा तासांत शक्य होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे. नवन्याने होणार असणारा हा हाईवे औरंगाबाद ते पुणे शहरांना जोडणार आहे. या हाईवेच्या बांधकामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
एवढचं नाही तर राज्यात नव्याने सहा एक्सप्रेस हाईवे बांधण्यात येणार असल्याची घोषणा देखील गडकरींनी केली आहे. तरी राज्यातील जनतेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण यामुळे व्यापार, दळणवळण, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि विविध बाबींना चालना मिळणार आहे. हल्ली नागपुर पुणे प्रवासासाठी किमान १५ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो पण एकदा या नव्याने होणार असलेल्या हायवेचं बांधकाम पुर्ण झाल्यावर हे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे. (हे ही वाचा:- Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg चं नागपूर-मुंबई पहिल्या ट्प्प्याचं PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण)
PM के नेतृत्व में हम औरंगाबाद से पुणे तक हाईवे बना रहे हैं और जल्द ही उसके कार्य का शुभारंभ होगा, जिससे नागपुर से पुणे केवल 6 घंटे में पहुंच सकेंगे। हम महाराष्ट्र में 6 एक्सप्रेस हाईवे भी बना रहे हैं: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, नागपुर, महाराष्ट्र pic.twitter.com/iIktWh8VOY
— ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2022
तसेच या हायवेचा विदर्भा प्रमाणेचं मराठवाड्यातील जनतेला दजेखील मोठा फायदा होणार आहे. कारण सध्या औरंगाबाद ते पुणे हे अंतर कापण्यासाठी जवळपास पाच तासं लागतात पण हा हाईवे झाल्यानंतर या प्रवासास दोन तासही लागणार नाही. तरी हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रास जोडण्यास अधिक सोयिस्कर ठरणार आहे.