Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Accident On Thane-Belapur Road: गेल्या ठाणे-बेलापूर रोड (Thane-Belapur Road) वर दिघाजवळ राज्य परिवहन बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6.15 च्या सुमारास शिवनेरी राज्य परिवहन बस नवी मुंबईतील दिघा येथील आंबेडकर नगर बसस्थानकाजवळ बेलापूरकडे जात असताना ही घटना घडली.

या अपघातात रोहित महाजन या 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मोटारसायकलवर बसलेला सुमित संजय मोहिते आणि महाजन यांच्यासह दुचाकीवरील प्रवीण कडू हे जखमी झाले आहेत. रोहित आणि सुमित महाजन यांना सोडण्यासाठी जात होते. (हेही वाचा -Ghaziabad Road Accident: गाझियाबादमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दिली धडक, 4 ठार, 24 जखमी_

प्राप्त माहितीनुसार, अमोल सुरवसे असं शिवनेरी बस चालवणाऱ्या चालकाचं नाव आहे. शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चालक सुरवसेविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.  (हेही वाचा - Kolhapur Accident: कोल्हापूर मध्ये ऑटो-मोटारसायकल यांच्यात धडक; 6 जखमी)

दरम्यान, गेल्या महिन्यात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) दोन बसमध्ये झालेल्या धडकेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातात 40 ते 50 प्रवासी जखमी झाले होते. चिंचपूर, आष्टी, बीड येथील नामदेव बाबुराव आढाव (वय 78) आणि दौंडमधील विरोबावाडी पाटस येथील सुवर्णा संतोष होले (38) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता.