परीक्षा (Photo Credit: PTI)

यंदा HSC आणि SSC च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळ ऑनलाईन माध्यमातून हॉल तिकीट उपलब्ध करून देणार आहे. मंडळाच्या संकेत स्थळावरूनच त्याची प्रत काढता येणार आहे. मागील वर्षी पुणे (Pune) विभागात प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात आली होती. तो प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता राज्यातील साऱ्याच विभागामध्ये ची हॉल तिकिटं विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून मिळणार आहेत. 2019 पासून SSC विद्यार्थ्यांसाठी असेल एकच प्रश्नपत्रिका; शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कसं मिळवाल ऑनलाईन माध्यमातून हॉलतिकीट ?

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाच्या वेबसाईटवरून हॉल तिकीटाची प्रत डाऊन लोड करायची आहे.

हॉल तिकिटाच्या प्रतीवर मुख्याध्यापक, प्राचार्यांची सही आणि शिक्का आवश्यक आहे.

विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटावर विषय, माध्यम, विभाग मंडळ यामध्ये काही बदल करायचा असल्यास ती दुरुस्ती विभागीय मंडळाकडे मिळणार आहे.

हॉल तिकिटावर विद्यार्थाचा फोटो चुकीचा असल्यास त्याजागी फोटो चिटकवून त्यावर शिक्का व सही घेणं आवश्यक आहे.

हॉल तिकीटाची प्रत हरवल्यास दुसरी प्रत दिली जाईल. त्यावर ड्युप्लिकेट प्रिंट असे लाल अक्षरात लिहलेलं असेल. SSC, HSC 2019 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार परीक्षा

यंदाच्या वर्षांपासून विद्यार्थांना ऑनलाईन माध्यमातून हॉलतिकीट मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हे हॉलतिकीट कधीपासून उपलब्ध राहील, त्याची वेबसाईट आणि तारीख याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे.