SSC, HSC 2019 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार परीक्षा
दहावी परीक्षा वेळापत्रक Photo Credits Pixabay

SSC, HSC 2019 TimeTable :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2019 वर्षात घेण्यात येणार्‍या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC)  परिक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तयारीसाठी वेळेचं नियोजन करता यावं याकरिता शैक्षणिक मंडळ दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर करते. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.mahahsscboard.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. 2019 पासून SSC विद्यार्थ्यांसाठी असेल एकच प्रश्नपत्रिका; शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

यंदा दहावीचे विद्यार्थी बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परिक्षा देणार आहे. तर पुन्हा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित जुने वेळापत्रक वेगळे जाहीर करण्यात आले आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना शाळेकडूनच दिले जाणार आहे. यंदा 17 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत.