2019 पासून SSC विद्यार्थ्यांसाठी असेल एकच प्रश्नपत्रिका; शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

2019 च्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता अनेक प्रश्नप्रत्रिकांऐवजी एकच प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने एकच प्रश्नपत्रिका देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

अभ्यासक्रमात बदल करुन नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय सचिवांना एकच प्रश्नपत्रिका पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिक्षक मंडळाने परिपत्रक जाहीर केले असून यासंबंधित सर्व सूचना मुख्याध्यापक, परिक्षक, परीरक्षक, संचालकांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयानुसार इंग्रजी (द्वितीय/ तृतीय भाषा), गणित (भाग 1/ 2) या विषयांसाठी आता बहुसंच प्रश्नपत्रिकांऐवजी एकच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे.

दहावीच्या बदललेला अभ्यासक्रम हा प्रॉक्टीकल गोष्टींवर अधिक भर देणारा असेल. हा अभ्यासक्रम Knowledge based असल्याने परीक्षेत हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दहावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आकलन (grasping), उपयोजन (Deployment),

रसग्रहण अभिव्यक्ती विकास (Rasve expression development) यावर आधारीत प्रश्नांचा समावेश असणार आहे.

त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत फक्त पुस्तकातील नाही तर पुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्नांनाही सामोरे जावे लागणार आहे. यामुळे बहुसंची प्रश्नपत्रिका मुलांना देण्याची आवश्यकता नसल्याचे काही विषयतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांनी आपले हे मत बालभारतीकडे मांडले होते. त्यानुसार बदललेल्या अभ्यासक्रमासाठी 2019 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.