Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतून खोट्या माहितीचा प्रसार; आतापर्यंत 413 गुन्हे दाखल तर, 223 जणांना अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. व्हाट्सऍप, फेसबूक, ट्विटर, टिक-टॉक आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मडिया खोट्या माहिती परवल्याप्रकरणी महाराष्ट्रात 413 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर, 223 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. या काळात अनेकजण सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. त्याचप्रकारे सोशल मीडियावरील अफवांना अधिक वेग आला आहे. लॉकडाउन काळात व्हाट्सऍप- 173, फेसबूक- 164, टिक-टॉक- 20, ट्विटर- 7 , इंस्टाग्राम- 4 , अन्य सोशल मीडिया प्लेटफॉर्म- 45 असे आतापर्यंत एकून 413 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेत याप्रकरणी 233 जणांना अटक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Lockdown In Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन; राज्यात आतापर्यंत 1 लाख 13 हजार 893 गुन्ह्यांची नोंद

महाराष्ट्र सायबर विभागाचे ट्वीट-

महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचवला आहे. एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर आढळल्यानंतर संभाव्य घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने  पाऊले उचलली गेली.