Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवासी वाहतुकीसाठी अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू केल्या आहेत. गणपती उत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचा या अतिरिक्त सेवांचा उद्देश आहे. सुरळीत आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

रेल्वेने मडगाव ते सीएसएमटी स्पेशल एक्स्प्रेस (वन वे) ट्रेन सुरु केली आहे. ही 18 LHB कोचची ट्रेन असून यामध्ये 16 बसण्याचे डबे, 2 ब्रेक-व्हॅन असतील.

गाडीचे मडगाववरून प्रस्थान 24 सप्टेंबर सकाळी 7.30 ला होईल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रात्री 10.55 वाजता पोहोचेल.

रेल्वेने सुरु केलेली दुसरी गाडी म्हणजे सीएसएमटी ते सोलापूर स्पेशल एक्स्प्रेस (वन वे). गाडीची रचना 18 LHB कोच (16 बसण्याचे डबे, 2 ब्रेक-व्हॅन) अशी असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 5.50 वाजता सुटेल व सोलापूरला दुपारी 2.50 वाजता पोहोचेल.

तिसरी ट्रेन खेड ते पनवेल मेमू स्पेशल ट्रेन आहे. यामध्येअनारक्षित 8-कोच असतील. खेडवरून या गाडीचे प्रस्थान 24 सप्टेंबर दुपारी 3.15 ला होईल. ही गाडी पनवेलला संध्याकाळी 7.45 वाजता पोहोचेल. (हेही वाचा: Mumbai Ganpati Visarjan 2023: गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा)

दुसरीकडे, प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, भारतीय रेल्वेने नयनरम्य कोकण मार्गावरून जाणाऱ्या दोन गणपती विशेष गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नुकतेच 20 सप्टेंबरपासून सुरू होणारी, 01167/68 लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)-कुडाळ एक्स्प्रेस या मूळत: 22 डब्यांच्या गाडीमध्ये आणखी दोन डबे जोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 01165/66 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर एक्स्प्रेस, या 22 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गाडीमध्येही आणखी दोन डबे जोडण्यात येतील.