Special Train for UPSC Exam: युपीएससी परीक्षेच्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी, पण 'या' अटी असणार लागू
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Special Train for UPSC Exam:  सध्या कोरोना व्हायरसचे महासंकट ओढावले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु सुद्धा झालेले नाही. मात्र विविध परीक्षा पुढे ढकल्यानंतर आता त्या पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अद्याप लोकल सेवा सामान्यांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. फक्त अत्यावश्यक सेवा सुविधांमधील कर्मचारी प्रवास करत आहेत. पण आता युपीएससीच्या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती युपीएससीच्या सेक्रेटरी यांनी केली आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या काळात ट्रेनने 3 आणि 4 ऑक्टोंबरला प्रवास करता येणार आहे. ही परीक्षा देशभरातील 2569 केंद्रांवर पार पडणार आहे.

युपीएससीच्या उमेदवारांना मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. परंतु परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांनी Call Letter आणि I-Card रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी दाखवावे अशी अट घालण्यात आली आहे. याबद्दल पश्चिम रेल्वेने माहिती दिली आहे.(JEE Advanced Results 2020 Date: 5 ऑक्टोबरला जाहीर होणार जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल; jeeadv.nic.in वर असे पहा मार्क्स)

त्याचसोबत दिल्ली मेट्रो सुद्धा उद्या सकाळी 6 वाजल्यापासून युपीएससीच्या उमेदवारांसाठी सुरु असणार आहे.(Revised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा)

दरम्यान, युपीएससीची परीक्षा रविवारी पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून देशातील विविध राज्यातून स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.  दुसऱ्या बाजूला युपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. मास्क शिवाय परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाणार नाही आहे. उमेदवारांना सॅनिटायझर परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या नियमांचे पालन आणि सोशल डिस्टंन्सिंग सुद्धा पाळावे लागणार आहे.