मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) भंडारवाडा जलकुंभाचा (Bhandarwada Jalkumbh) अभ्यास व तपासणी करण्याचे काम हाती घेत आहे. त्यामुळे येत्या बुधवार (25 सप्टेंबर 2019) सकाळी 10 ते गुरुवारी (26 सप्टेंबर 2019) सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत दक्षिण मुंबई (South Mumbai) परिसरात पाणीपुरवठा (Water Supply) दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई परिसरातील ए, बी, व ई विभागातील परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, जलाशयातील पाण्याची पातळी ध्यानात घेत पाण्याच्या नियोजित वेळेत बदल केला जाईल. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर काही काळ नळातून गढूळ पाणी येऊ शकेल असेही महापालिकेने म्हटले आहे.
दक्षिण मुंबईतील कोणत्या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील?
बुधवार २5 सप्टेंबर
‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड
‘बी’ विभाग - पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी. पी. टी. या विभाग
‘ई’ विभाग - बी. पी. टी., मोदी कंपाऊंड, डी. एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, टी. बी. कदम मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. रुग्णालय
गुरुवार, २६ सप्टेंबर
‘बी’ विभाग – डोंगरी रोड, युसुफ मेहेरअली रोड, जकारीया मस्जिद रोड, मेमनवाडा रोड, मोहम्मद अली रोड, कांबेकर रोड, झंजीकर रोड, शेरीफ देवजी रोड, अब्दुल रेहमान रोड, पायधुनी
‘ई’ विभाग - मदनपुरा, ना. म. जोशी रोड, क्लेअर रोड, साखळी रोड, मौलाना आझाद रोड, दत्तारामभाऊ कोयंडे रोड, बीआयटी ताडवाडी, सेठ मोतीशाह मार्ग, जे. जे. रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय,डॉ. आनंदराव नायर रोड, मोटलीबाई रोड, आग्रीपाडा चाळ, मेघराज शेट्टी रोड, जहांगिर बोमन बेहराम रोड, साने गुरुजी रोड, गेल रोड, मौलाना आझाद रोड, नायर रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (हेही वाचा, अशा पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होऊ शकतात विपरित परिणाम)
संबंध दिवसभर आणि दुसऱ्या दिवसातील काही तास पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास व तपासणी करुन पाणीपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामुळे नागरिकांनाही अधिक सक्षमपणे पाणीपुरवठा मिळविण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.