RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे.

RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
KKR vs RCB (Photo Credit - X)

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, Indian Premier League 2025 58th Match: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा आयपीएल 2025 चे उर्वरित सामने पुन्हा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, उर्वरित सामने आजपासून म्हणजेच 17 मे पासून खेळवले जातील. स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड (RCB vs KKR Head to Head Record)

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. केकेआर संघाने 20 सामने जिंकले आहेत. तर, आरसीबीने फक्त 15 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये 12 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने आठ सामने जिंकले आहेत. तर, आरसीबीने चार सामने जिंकले आहेत.

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

विराट कोहली: आरसीबीचा घातक फलंदाज विराट कोहलीने गेल्या 10 डावांमध्ये 425 धावा केल्या आहेत. या काळात विराट कोहलीने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. विराट कोहलीचे शानदार टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना आरसीबीच्या बाजूने वळवू शकतात.

रजत पाटीदार: आरसीबीचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रजत पाटीदारने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा रजत पाटीदार लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.

यश दयाल: आरसीबीचा स्टार गोलंदाज यश दयालने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. यश दयालचे अचूक यॉर्कर आणि स्विंग फलंदाजांना त्रास देऊ शकतात.

सुनील नरेन: कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने 10 सामन्यांमध्ये 321 धावा केल्या आहेत. या काळात सुनील नारायणने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सुनील नरेनची आक्रमक फलंदाजी आणि गूढ फिरकी केकेआरसाठी गेम चेंजर ठरू शकते.

व्यंकटेश अय्यर: केकेआरचा स्फोटक फलंदाज व्यंकटेश अय्यरने 305 धावा केल्या आहेत. यादरम्यान, व्यंकटेश अय्यरने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर व्यंकटेश अय्यर स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो.

वरुण चक्रवर्ती: केकेआरचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान, वरुण चक्रवर्तीने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 7516 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).