KKR vs RCB Match Update: पावसामुळे कोलकाता-बेंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबलमध्ये टॉपवर

आरसीबीला आयपीएल पॉइंट टेबलमध्ये 17 गुण मिळाले आहेत आणि संघ टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. तर कोलकाताच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या हंगामात केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

KKR vs RCB Match Update: पावसामुळे कोलकाता-बेंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबलमध्ये टॉपवर
KKR vs RCB (Photo Credit - X)

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, Indian Premier League 2025 58th Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs KKR) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले आहेत. यासह, आरसीबीला आयपीएल पॉइंट टेबलमध्ये 17 गुण मिळाले आहेत आणि संघ टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. तर कोलकाताच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या हंगामात केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, आरसीबीने प्लेऑफमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर थेट सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर, अनेक चाहते पांढऱ्या जर्सी घालून मैदानावर आले, परंतु त्यांना विराटला क्षणभरही मैदानावर पाहता आले नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2025 10:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).