उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला सोनिया गांधी, राहुल गांधी, राज ठाकरे यांच्यासह या दिग्गज नेत्यांना दिले आमंत्रण

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाला सत्तास्थापनेचे लागलेले ग्रहण अखेर सुटले. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यातच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (ShivSena NCP-Congress) महाविकासआघाडीने एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Sonia Gandhi), महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना (MNS) अध्यक्ष राजठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह शिवसेना पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अहमद पटेल यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज एकदिवसीय विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. मंगळवारी महाविकासआघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले होते. उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी 6.40 वाजता शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह राजठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला ठाकरे कुटुंबीयाची उपस्थिती पहायला मिळणार का? याची उत्सुकता वाढली आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीही पाहायला मिळणार आहे. हे देखील वाचा- उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला बंधू राज ठाकरे राहणार उपस्थित? 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्क वर रंगणार सोहळा

उद्धव हे ठाकरे कुटुंबियातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. तसेच हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.