Train | (Photo Credits: X)

Solapur Pune Railway Cancel: सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे( Electronic Interlocking Work) करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर-पुणे रेल्वे (Solapur Pune Railway)सेवेवर होणार आहे. सोलापूर पुण्यादरम्यान, धावणाऱ्या 17 रेल्वे रद्द झाल्या आहेत. दौंड येथे फेज वनमधील प्री एनआय, गुड यार्ड, ए केबिन, कॉर्ड लाइन आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक (Solapur Pune Railway Block)घेण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातून धावणाऱ्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 21 गाड्या मिरजमार्गे वळविण्यात आल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यामुळे सलग 4 दिवस रेल्वे सेवेत विस्कळितपणा येणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (हेही वाचा:रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड, पण 'हे' नियम लक्षात ठेवा )

रद्द झालेल्या रेव्ले गाड्या

  • नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
  • पनवेल - नांदेड एक्स्प्रेस
  • पुणे - सिकंदराबाद एक्स्प्रेस
  • सिकंदराबाद - पुणे एक्स्प्रेस
  • पुणे - सोलापूर एक्स्प्रेस
  • सोलापूर - पुणे एक्स्प्रेस (12270)
  • पुणे - सोलापूर (11417)
  • सोलापूर - पुणे (11418)

मिरजमार्गे वळविलेल्या 21 गाड्या

  • लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही रेल्वे पुणे - मिरज - कुर्डुवाडीमार्गे धावेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बंगळूर एक्स्प्रेस ही रेल्वे पुणे - मिरज - कुर्डुवाडीमार्गे धावे
  • बेंगळुरु - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही रेल्वे कुर्डुवाडी - मिरज - पुणेमार्गे धावेल
  • नागरकोईल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही रेल्वे गुंतकल -बल्लारी -हुबळी -मिरज -पुणेमार्गे धावेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोईल ही रेल्वे पुणे- मिरज- हुबळी- बल्लारी- गुंतकलमार्गे धावेल
  • चेन्नई - एकता नगर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस कुर्डुवाडी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • हजरत निजामुद्दीन - हुबळी मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- पुणे- मिरज- हुबळी मार्गे धावेल
  • वाराणसी - हुबळी एक्स्प्रेस मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- पुणे- मिरज- हुबळी मार्गे धावेल
  • गदग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस गदग- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्स्प्रेस पुणे- मिरज- हुबळी- गदगमार्गे धावेल
  • पंढरपूर-दादर एक्स्प्रेस मिरज-सातारा- पुणेमार्गे धावेल
  • दादर-पंढरपूर एक्स्प्रेस पुणे-सातारा-मिरजमार्गे धावेल
  • लोकमान्य टिळक टर्मिनस - कोइमतूर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • कोइमतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पुणे- मिरज- हुबळी- बल्लारी- गुंतकल धावेल
  • तुतिकोरीन - ओखा एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • यशवंतपूर - बाडमेर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • नागरकोईल -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकलमार्गे धावेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोईल एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
  • चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणे धावेल
  • अहमदाबाद - यशवंतपूर एक्स्प्रेस सुरत - वसई रोड- पुणे- मिरज- हुबळीमार्गे धावेल

सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार

श्री साई नगर शिर्डी - मैसूर

वाराणसी - पुणे

मैसूर - श्री साई नगर शिर्डी

मैसूर - श्री साई नगर हे रेल्वे श्री साई नगर रेल्वे स्थानकांवरून रात्री 11.55 वाजता सुटण्याऐवजी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 7,10 वाजता सुटेल.

वाराणसी - पुणे एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्टओरिजिनेट होईल आणि ही गाडी पुणे रेल्वे स्थानकांवरून सकाळी 11,20 ला सुटण्याऐवजी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 14.45 ला सुटेल.

सोलापूर - दौंड डेमू, दौंड-सोलापूर डेमू, पुणे - हरंगुळ एक्स्प्रेस, हरंगुळ - पुणे एक्स्प्रेस, सोलापूर - पुणे डेमू (14222), पुणे - सोलापूर डेमू (11421), अमरावती - पुणे एक्स्प्रेस, 1220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पुणे - अमरावती एक्स्प्रेस, अमरावती - पुणे एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत.