सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उभारी मिळाली आहे. भाजप (BJP) नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Mohite Patil ) यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil ) यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथील टीळक भवन या काँग्रेस कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबतच त्यांच्या शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी 'एकच वादा धवल दादा' अशा घोषणा दिल्या.
पक्षप्रवेशावेळी बोलताना डॉ. धवलसिंह म्हणाले काँग्रस ही एक विचारधारा आहे. या विचारधारेसोबत काम करण्याची मला नव्याने संधी मिळाली. राजकारणात दिवस सारखे राहात नाहीत. बरे वाईट दिवस येत असतात. परंतू, काँग्रेस आणि आमचे जुनेच नाते आहे. माझे वडील काँग्रेसमध्येच होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याची संधी दिली. आता मलाही काँग्रेस विचारधारेसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. (हेही वाचा, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेस पक्षात प्रवेश)
धवलसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत सांगायचे तर ते माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. याशिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष पदही आहे. एकेकाळी धवलसिंह हे थेट शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने सोलापूर काँग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकण्यास मदत होणार आहे. शिवाय काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनाही बऱ्यापैकी बळ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अशा वेळी जर काँग्रेस पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे स्वागत होणे स्वाभाविक आहे.
LIVE: डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश https://t.co/bzSqgsA6WJ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 28, 2021
भाजपमध्ये अस्वस्थ असलेले धवलसिंह मोहितेपाटील हे नेमके कोणत्या पक्षाच्या दिशेने जातील याबाबत अनेकांना उत्सुकता होती. कारण धवलसिंह यांचा शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा प्रवास या आधी झाला आहे. आता ते काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत.