सोलापूर: Bank of Maharashtra करमाळा शाखा इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 जण ठार
Bank of Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सोलापूर (Solapur ) जिल्ह्यातील करमाळा येथे बँक कार्यालयाच्या इमारतीचा स्लॅब (छत) कोसळल्याने काही नागरिक आणि  कर्मचारी जखमी झाले. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) करमाळा (Karmala ) शाखा कार्यालयात बुधवारी (31 जुलै 2019) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार या घटनेत 1 जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा करमाळाचे कार्यालय नेहमीप्रमाणे वेळेत सुरु झाले. कार्यालय सुरु होताच काही मिनिटांनी ही घटना घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळत असल्याचे ध्यानात येताच काही कर्मचारी तातडीने इमारतीबाहेर आले. मात्र, काही कर्मचारी आणि बँकेच्या ग्राहकांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ते मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकलेल्या काही नागरिक आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्या आली आहे. तर काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.