Maharashtra State Road Development Corporation : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून 1 डिसेंबर पासून सायन येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार होते. मात्र सध्या २० दिवसांसाठी हे काम पुढे ढकलण्यात आलं आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यानांतर निर्माण होणाऱ्या ट्रॅफिसच्या समस्या आणि पर्यायी मार्ग यावर प्रशानाकडून प्लॅन बनवला जात आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी पर्यायी सेवेला मंजुरी दिल्यानंतर उड्डाण पुलाचे काम सुरु केले जाईल. सायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करुन दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार होतं .
1.1 किलोमीटरच्या सायन उड्डाणपुलावर २+२ लेनचे काम होणार आहे. या मार्गावर नियमित 15,000 वाहनांची ये- जा असते. सध्या मुंबईत मेट्रोचं काम सुरु आहे, लोअर परेल स्थानकाबाहेरील पुलाचेदेखील काम सुरु आहे. त्यामुळे मुंबईत अधिक वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे सायनचा उड्डाणपूल बंद केल्यास पर्यायी सेवा आणि ट्राफिक यावर प्रशासन सध्या विचार करत आहे.
सायनचा उड्डाणपूल बीकेसी, धारावी, कुर्ला, माटुंगा, चेंबूर, नवी मुंबई, पनवेल आणि पुणे या मार्गांना जोडला जात होता. यापूर्वी सायन उड्डाणपूलाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात पूलाची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.