Kolhapur News: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भक्तांना देवीचे दर्शन (Shree Karveer Niwasini Ambabai Darshan) घेता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांना आता अंबाबाई मंदिरात जाऊन देवीच्या पायावर डोके ठेऊन नतमस्तक होता येणार आहे. उद्या म्हणचेच येत्या 29 ऑगस्टपासून भाविकांना दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या आणि महाराष्ट्रासह अवघ्या भारतभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीचे दर्शन जवळून दर्शन मिळणार असल्याने श्रद्धाळूंमध्ये आनंताचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात कोविड-19 प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होता तेव्हा सर्वच धार्मिक स्थळे बंध ठेवण्यात आली होती. कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंततर निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र, मंदिरांतील काही नियम तसेच राहिले होते. त्यामुळे आंबाबाई मंदिरात भाविकंना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत होते. आता मंदिर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने थेट गाभाऱ्यात जाऊन देवीच्या पायावर डोके ठेवता येणार आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती देताना सांगितले की, भाविकांना आता केवळ देवीच्या पायावरच डोके ठेऊन दर्शन घेता येणार नाही. तर त्यासोबतच गाभाऱ्या जाऊन देवीची ओठीही भरता येणार आहे. करवीरनिवासीनीवर भाविकांची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर येतात. या भाविकांनी पाठिमागील अनेक दिवसांपासून मागणी केली होती की त्यांना गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेऊ द्यावे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, कोविडनंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमध्ये भाविकांकडून होणाऱ्या दानातही मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. या दानपेठीतील दानाची अलिकडील काळात केलेली शेवटची मोजदाद तब्बल एकूण 70 लाख 622 रुपये झाली आहे. अनेक भाविक मोठ्या प्रमाणाव चिल्लर जमा करतात. पुण्यातील एका भाविकाने तर अंबाबाईसाठी पाच किलो चांदिच्या दागिण्यांचे तोरण अर्पण केले आहे.