Mumbai: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाउन निर्बंधादरम्यान, आरपीएसएफ जवानांनी मास्क (Mask) विकणार्या लोकांवर हल्ला केला. ही घटना मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाच्या (Kurla Railway Station) बाहेर घडली. येथे काही दुकानदार स्टॉल्सवर मास्क विकत होते. दरम्यान, जवानांनी त्यांचा स्टॉल उलटून टाकला आणि त्यांना मारहाणही केली. ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ही घटना सोमवारीची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्टोल पलटून लावण्याबरोबरच आरपीएसएफ जवान या लोकांना शिवीगाळ करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. दुकानदारांचा कॉलर धरून जवान त्यांना घेऊन जात असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. (वाचा - Uddhav Thackeray at Mumbai HC: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट)
त्याचवेळी आरपीएस जवानांनी आरोप केला की, दुकानदार बेकायदेशीरपणे मास्क विकत आहेत. जवानांच्या मते, यामुळे याठिकाणी गर्दी होईल. म्हणूनचं त्यांनी या लोकांना येथून हाकलून लावले. जवानांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, गर्दी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार नाही. मात्र, दुकानदारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. राज्यात गुरुवारी 42582 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 54535 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 4654731 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 533294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.34% झाले आहे.