मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) उपस्थिती दर्शवली. या वेळी त्यांच्यासोबत महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित होते असे समजते आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात आवारात कोरोना लसीसरण सुरु आहे. या लसीकरणाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयात उपस्थिती लावल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दीपंकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) यांचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात अचानक उपस्थिती का दर्शवली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालायला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी हेसुद्धा होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी न्यायाधिशांसोबत मराठा आरक्षण मुद्द्याविषयाही काही चर्चा केली का याबाबत उत्सुकता आहे. प्राप्त माहितीनुसार प्रोटोकॉल असा आहे की, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे मुख्यमंत्री अथवा इतर कोणत्याही मंत्र्याची भेट घेऊ शकत नाही. परंतू, मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भेटण्याचा प्रोटोकॉलनुसार अधिकार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि न्यायाधीशांमध्ये भेट झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि न्यायाधीश यांच्यात नेमकी चर्चा काय झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली असावी याबाबतची उत्सुकता कायम आहे. प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शुक्रवार, 14 मे 2021) सकाळी 10.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले.मध्ये चर्चा सुरू असून नेमकी कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. (हेही वाचा, Mumbai Coronavirus Update: मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमणाचे प्रमाण घटले, मात्र वाढत्या मृत्यूदरामुळे चिंता वाढली)
विशेष म्हणजे उच्च न्यायालयातील भेट ही मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कार्यक्रम पत्रिकेचा भाग नव्हती. आज मुख्यमंत्री सकाळी 11.30 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वर्षा निवासस्थानी महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करणार होते. त्यानंतर 1.30 वाजता उस्मानबाद साखर कारखान्याचं दृश्यप्रणाली द्वारे उद्घाटन करणार होते. असे हे दोनच कार्यक्र नियोजीत होते. मात्र, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा न्यायालयाकडे वळला.