Ahmednagar News: ट्रॅक्टर विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने शॉक, दोघांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना
Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील हातवळण बनपिंपरी रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना ट्रॅक्टर विद्यूत तार संपर्कात आल्याने मोठा घात घडला आहे. या घटनेता एका मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यूत लाईनची तार खाली लोंबकलेली असल्यामुळे ट्रॅक्टर संपर्कात आला. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शिवाजी बापूर नागवडे साखर कारखान्यातील एका मजूराचा मृत्यू झाला. मजूर रात्री 24 मार्चला दहा वाजता ऊस तोडचे काम संपून घराकडे निघाले होते. ट्रॅक्टरमध्ये सर्व साहित्य भरले. रस्त्याच्या मध्योमध ट्रॅक्टर विद्युत तारांच्या संपर्कात आली. विद्युत तार लोंबकळत होती त्यामुळे ही दुर्घटना घडली. विद्यूत तारांमुळे जोरात शॉक बसला आणि त्यामुळे एक मजूर आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला.

शॉक लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमीला तात्कळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.  फुलाबाई नरसिंह जाधव या महिला मजुराचा मृत्यू झाला तर अंकुश रोहिदास जाधव हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.