शिवस्मारक (Representative and file images)

अरबी समुद्रामध्ये भव्य शिवस्मारकाच्या उभारणीसाठी पायाभरणीला आजपासून सुरूवात होणार होती. मात्र या शुभारंभाच्या कार्यक्रमात विघ्न आले आहे. एक स्पीड बोट खडकाला आपटल्याने अपघात झाला आहे. यामुळे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

शिवस्मारकाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी 3 स्पीड गेल्या होत्या. त्यापैकी एक बोट अपघातग्रस्त झाली आहे. या बोटीवर 25 जण होते. अपघातग्रस्त बोटीवर काही पदाधिकारी होते. सुदैवाने सारे सुखरूप आहेत. पाण्यात पडलेल्या सार्‍यांना बचावण्यात आले आहेत. विनायक मेटेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होते.

बचावकार्यासाठी चॉपर आणि अग्निशामक दलाची टीम पोहचली आहे. शिवस्मारकाच्याजवळ असताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही स्पीड बोट खडकाला धडकली. मुख्य सचिव या अपघातग्रस्त बोटीमध्ये होते.समुद्राकिनार्‍यापासून 3 किमी आत  शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम होता. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच अपघात झाला.  पहा कसं असणार आहे शिवस्मारक 

कसा झाला अपघात

लाईटहाऊसच्या खडकाला स्पीडबोट आपटली. बोटीमध्ये पाणी भरायला लागलं. हळूहळू बोट बुडायला लागली. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे