अमरावतीमध्ये (Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला प्रकरण्याचे आज संतापजनक परिणाम पहायला मिळाले आहेत. काही शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या पालिका आयुक्त प्रविण आष्टेकर (Pravin Ashtekar) काळी शाई फेकली आहे. हा प्रकार ऐन रस्त्यामध्ये झाला आहे.
काही व्यक्तींनी पुलाखाली पाणी साचल्याच्या तक्रारीचा फोन आयुक्त आष्टीकर यांना केला त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी स्वतः पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार आष्टीकर 'त्या' ठिकाणी पोहचल्यानंतर अचानक 4-5 जणांनी अंगावर बाटलीभर शाई फेकली. नंतर तेथून पळ काढण्यातही ते यशस्वी ठरले. दरम्यान अचानक झालेल्या गोंधळामुळे आयुक्तांसोबत असलेले कर्मचारी आणि पोलिसांचीही तारांबळ उडाली. मात्र सुरक्षितपणे तेथून त्यांना दूर नेण्यात आले. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तसेच शाईफेक करणार्यांचा शोध सुरू आहे. बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 दिवसात बसवणार; कर्नाटक सरकारचं आश्वासन.
आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. मात्र पालिकेने आता तो हटवला आहे. याचवरून आता राजकारण तापले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी महापालिकेत केली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो पालिकेने हटवला आहे.