महापुरामुळे थांबलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 19 ऑगस्टपासून सुरु; खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार महाराष्ट्र दौरा
Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

भाजपने (BJP) सध्या राज्यात जे तोडफोडीचे राजकारण सुरु केले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनेही (NCP) कंबर कसली आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे (Shiv Swarajya Yatra) नियोजन करण्यात आले होते. मात्र कोल्हापूर व सांगली येथील पुरामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान ही यात्रा काढली जाणार आहे.

पैठण येथे 19 ऑगस्टला सकाळी 9 वाजता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ होईल. याच दिवशी साली 11 वाजता व दुपारी 2 वाजता दोन सभा पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली. मराठवाडा, यवतमाळ या ठिकाणच्या काही भागामधून ही यात्रा जाणार आहे. (हेही वाचा: शिवसेना, भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा; घडणार 3 हजार किलोमीटरचा प्रवास)

दरम्यान, या यात्रेत तरुणांची नोंदणी केली जाणून असून, त्यांच्या भविष्याबाबत, महाराष्ट्रातील समस्येबाबत, काही महत्वाच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला जाणार आहे. मात्र हे सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेगाने राष्ट्रवादीमधील आमदार भाजप-शिवसेनेट प्रवेश करत आहे त्यामुळे पक्ष पूर्णतः हादरला आहे. आता जितके लोक पक्षात आहेत त्यांच्यात तरी एकी ठेऊन नवचैतन्य निर्माण करणे गरजेचे आहे, म्हणूनच या यात्रेचा घाट घातला गेला आहे.