शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या दोन महिला नेत्यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) अशी या दोन महिला नेत्यांची नावे आहेत. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेना प्रवक्त्या आहेत. तर, शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या दहिसर येथील नगरसेविका आहेत. दोघींनाही ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) बोरीवली एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, आशिष केआर द्विवेदी नामक व्यक्तीने @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांना धमकी दिली आहे. शीतल म्हात्रे या आपले ट्विटर अकाऊंट तपासत असताना आशिष द्विवेदी नावाच्या व्यक्तीने @ASHISHKRDW2 ट्विटर हँडलवरुन आपल्याला काही टॅक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काळजीपूर्वक पाहिले असता ती जीवे मारम्याची धमकी असल्याचे द्विवेदी यांच्या लक्षात आले. त्यानंतर द्विवेदी यांनी या प्रकाराचा स्क्रीनशॉट घेत पोलीसांकडे तक्रार दिली. (हेही वाचा, मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार गजाआड; सातारा पोलिसांची मुंबई येथे कारवाई)
प्रियंका चतुर्वेदी ट्विट
Thank you @sheetalmhatre1 and @Iamrahulkanal for helping file an FIR against such open death threats. Disagreement is acceptable, threats aren’t pic.twitter.com/NDsiA9RxG8
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) October 30, 2019
दरम्यान, प्राप्त तक्रारीवरुन पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम 506 अन्वये एका व्यक्तिविरोधा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलीस तपास करत आहेत.
प्रियंका चतुर्वेदी यांनी अलिकडेच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश करत शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चतुर्वेदी यांना प्रवक्तेपद देण्यात आले. तर, शीतल म्हात्रे या शिवसेना नगरसेवक असून, दहिसर महापालिकेत त्या विधी व महसूल समिती अध्यक्ष आहेत.