Sanjay Raut (Photo Credit - PTI)

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ( Farm Laws ) शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू (Farmers Protest) आहे. या कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी येत्या मंगळवारी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेसनंतर (Congress) आता शिवसेनेही भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. तसेच देशातील जनतेला भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा! शेतकरी अन्नधान्य पुरवणारे आहेत. त्यांच्यावरील आपली नैतिक जबाबदारी म्हणून देशातील जनतेनेही शेतकरी बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. हे देखील वाचा- Farmers Protest: अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याची विनंती

संजय राऊत यांचे ट्विट-

देशात 8 डिसेंबरला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भारत बंद पुकारण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम असेल. केवळ रुग्णवाहिका आणि लग्न समारंभासाठी रस्ते खुले असतील. सर्वच ठिकाणी शांततेत निदर्शने करण्यात येतील. चंदिगडमध्ये सेक्टर 17 च्या मैदानावर शेतकरी 7 तारखेला मोठे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भुमिकेवर केंद्र सरकार काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.