Shiv Sena | Photo Credits: Twitter/ Arjun Khotkar

महाराष्ट्रात आज भाजपाने वीजबिलांविरोधात 'ताला ठोके' आंदोलन करत असतानाच शिवसेना देखील वाढत्या इंधनदरा वरून आक्रमक झालेली पहायला मिळाली आहे. दिवसागणिक वाढणारे इंधनदर पाहता अनेक ठिकाणी राज्यात शिवसेनेकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आज महाराष्ट्रात मुंबई मध्ये आंदोलना दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर देखील रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या आहे. राज्यात काही ठिकाणी बैलगाडी हाकत तर काही ठिकाणी दुचाकीची अंत्ययात्रा काढून शिवसेनेने वाढत्या इंधनवाढी विरोधात निषेध केला आहे.

मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळेस त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी देखील केलेली पहायला मिळाली. जालना मध्ये अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वाखाली दुचाकींची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. शहापूर मध्येही शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाड्या हाकत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी तहसीलदार्‍याला निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात नांदेड, भिवंडी, परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, पंढरपूर मध्येही अशाच प्रकारे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले.

जालना मधील  आंदोलन

मुंबईच्या बोरीवली भागात आंंदोलन

वाढत्या इंधनाच्या दरामुळे महागाई देखील वाढण्याची भीती बळावली आहे. आज शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना वर्षाला एसटी बस चालवायला 3 हजार कोटींचं डीझेल आवश्यक असतं, अशा इंधन दरवाढीमुळे भविष्यात हे ओझं राज्य सरकार आणि जनतेच्या खांद्यावर येणात आहे अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे सराकारने इंधनाचे दर नियंत्रित करावेत म्हणून मागणी जोर धरत आहे.