
शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पाठराखण करत महाविकासआघाडीला सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांचे कौतुक करत महाविकासआघाडीने राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवून नये. तर त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेकडे एक परिपक्व भाषण म्हणून पाहावे असे जाधव यांनी. शिवसेनेचा आक्रमक चेहरा मानल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांनी चक्क असे उद्गार काढल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केलेल्या भाषणावरुन शिवसेना नेते टीका करत असताना भास्कर जाधव यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भास्कर जाधवही चर्चेत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र करत म्हटले होते की, राज ठाकरे यांनी शिवसेनेला सल्ला द्यायच्या किंवा शिवसेनेने काय करवे हे सांगण्याच्या भानगडीत पडून नये. त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने काय करावे, ते पुढे काय करणार आहेत याबाबत बोलावे. शिवसेनेच्या हिंदुत्त्वाबद्दल त्यांनी बोलूच नये. त्यांनी कधीपासून हिंदुत्त्वाची शाल पांघरली? त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. माणसाला जर नैराश्य आले तर निराशेत तो काहीही बोलतो, असा टोलाही संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याकडून 'त्या' विधानाबाबत माफी; वादावरही पडदा)
दरम्यान, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असे म्हणत दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरजार टीका केली आहे. त्यामुळे एका बाजूला शिवसेना नेते राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असताना भास्कर जाधव यांच्या कौतुकोद्गारामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.