Raj Thackeray | MNS | File Photo | (Photo Credits- Facebook @Sachin Maruti More)

राम मंदिरच्या मुद्द्यामुळे देशात दंगल घडविण्यात येणार असल्याचा दावा मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी केला. मात्र शिवसेनेने यावर प्रतिउत्तर देत राज ठाकरे यांना राम मंदिरप्रकरणीच्या मुद्द्यावर भाष्य केले म्हणून टोला लगावला आहे.

शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर प्रतिउत्तर देत असे म्हणाले की, ज्यांना दंगलीबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवा. तसेच औवेसी यांच्या मदतीने देशात दंगल घडवून आणण्याचा कट रचला जात आहे असे ही राज ठाकरे त्यांच्या सभेत म्हणाले. (हेही वाचा -राज ठाकरे इफेक्ट: उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रात 'नो एंट्री'; उत्तर भारतीय महापंचायत समितीची घोषणा)

त्यामुळे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडविली असून दंगलीबाबत माहिती असेल तर पोलिसांना कळवा असे वक्तव्य केले आहे. तसेच पूर्वी राज्यात आगामी लोकसभेच्या काळात मोठ्या दंगली घडवून आणल्या जात असल्याचे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.