Shiv Sena Party | Image only representative purpose (Photo credit: File Image)

ओल्या दुष्काळाच्या अपत्तीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे. ही वळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. मात्र, त्याऐवजी सरकारची धावपळ आपल्या पाठीशी कोण उभे राहील यासाठीच सुरु उहे. राज्यात सध्या सरकार नावाची गोष्टच अस्तित्त्वात दिसत नाही. जनादेश मिळूनही सत्ते असलेले अद्याप नवे सरकार स्थापन करु शकलेले नाही. नाही म्हणायला एक काळजीवाहू नामक सरकार जरुर आहे. पण या सरकारच्या डोक्यात सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या पाठिंब्याचे आकडे कसे वाढतील याचा विचार जास्त आहे. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला द्यायचे सरकारी मदतीचे आकडे महत्त्वाचे आहेत. मात्र सत्ताबाजारात लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. शिवसेना (Shiv Sen) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दै. सामनामध्ये लिहिलेल्या संपादकीयात (Saamana Editorial ही टोलेबाजी करण्यात आली आहे.

दै. सामनाच्या संपादकीयात पुढे म्हटले आहे की, राज्यपालांनी राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणऊन, पालक या नात्याने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची घरज आहे. राज्यपाल महोद स्वत: एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे राज्याच्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा त्यांनी स्वत: जातीने घ्यावा. आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळेल असे पाहावे, असे शिवसेनेने सामना संपादकीयाच्या माध्यमातून म्हटले आहे. (हेही वाचा, राज्याच्या राजकारणात ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु; शिवसेना नेत्वृत्वाची भाजपवर जोरदार टीका)

दरम्यान, या संपादकीयात उद्धव ठाकरे यांनी, सत्तेच्या राजकारणापेक्षाही अडचणीत सापडलेल्या अन्नदात्याला वेळेत मदत करणे याला अधिक प्राधान्य असले पाहिजे असे आम्ही मानतो. कारण आमची बांधिलकी समजाशी आणि शेतकऱ्यांशी आहे. पंचनाम्याचे जे काही सोपस्कार असतील ते लवकर पार पाडा, अटी शर्थींच्या जाचक तरतुदी दूर करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या असेही म्हटले आहे.