Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook, File Photo)

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High court) निर्णयानंतर मेट्रो-03 च्या (Metro-03) कारशेडसाठी वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. परंतु, या वृक्षातोडीला पर्यावरण प्रेमींसह शिवसेना पक्षानेही तीव्र निषेध दर्शवला आहे. हिंदुस्तान टाईम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या वृक्षतोडीचे पडसाद शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. याप्रकरणी शिवसेना सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) धाव घेणार आहे. भाजप (BJP) सोडले तर,  शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (National Congress Party) सदस्यांनी आरेतील वृक्षतोडीला तीव्र निषेध नोंदवला आहे. मुंबई उच्च न्यायालायाने मेट्रोच्या कारशेडला (Metro car shed) विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर आरेतील संघर्ष पेटला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मेट्रोच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर अवघ्या काही तासातच आरेतील वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली होती. परंतु न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवत पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीच्या विरोधात अंदोलन कायम ठेवले आहे. या आंदोलनात शिवसेनेही उडी घेतली आहे. नुकतीच स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रो कारशेड आणि आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतला आहे. हे देखील वाचा-Aarey Protest: आरेतील वृक्षतोडीला विरोध कायम; पर्यावरण प्रेमींकडून दुसऱ्या दिवशीही अंदोलन सुरुच

सध्या आरे परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 29 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरेतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावली आहे.