Shiv Sena On Opposition Situation: ‘मरतुकड्या’ विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे 'ओडास गावची पाटीलकी'- शिवसेना
Opposition Leaders | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सर्व भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करु दिले जात नाही. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारतानाच मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष! विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे, अशी टोलेबाजी शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Saamana Editorial) करण्यात आली आहे.

'ओसाड गावची पाटीलकी' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात दै. सामनामध्ये म्हटले आहे की, विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल. (हेही वाचा, Shiv Sena On Farmers Protest: खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही- शिवसेना)

दरम्यान, सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आलेल्या भूमिकेवर भाजपने मात्र जारदार खिल्ली उडवली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे विरोधक विखुरलेले आहेत त्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा संल्ला सामना संपादकीयतून देण्यात आला आहे खरा. परंतू, हा सल्ला देत असताना शरद पवार यांच्यावर स्थुतीसुमने उधळण्यात आली आहेत. देशात केवळ पवार हेच सक्रिय आहेत बाकिचे निर्धिस्त असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतू काँग्रेस पक्षामुळेच शिवसेना सत्तेत आहे. असे असतानाही हिच शिवसेना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान कर आहे. राज्यातील काँग्रेस नेते सत्तेच्या मोहासाठी आपला स्वाभीमान गहाण ठेऊन किती काळ हा अपमान सहन करत राहणार आहेत? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे.