Sanjay Raut, Supriya Sule Dance Video: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा फॅमेली डान्स; ‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…” गाण्यावर थिरकले उपस्थित
Sanjay Raut, Supriya Sule Dance Video | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एक बिनधास्त व्यक्तिमत्व. आपल्या खोचक विधानांनी विरोधकांना नेहमीच नामोहरम करणारे. पण कधी कधी हेच संजय राऊत टिपीकल राजकारण्यापेक्षा काहीसे वेगळे दिसतात. कधी ते पेटीवर सूर छेडताना दिसतात. तर कधी शायरी करताना. कन्या पूर्वशी हिच्या विवाहात तर हेच संजय राऊत चक्क डान्स करताना दिसले. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत डान्स केला. ‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…” गाण्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा हा डान्स (Sanjay Raut, Supriya Sule Dance Video) सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल   झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी येत्या 29 नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होत आहे. या विवाहाच्या निमित्ताने आयोजित आयोजित संगीत कार्यक्रमात विविध राजकीय मंडळी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी ठेका धरला. (हेदखील वाचा- Purvashi Raut Engagement Ceremony: संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे, पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित )

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

या वळी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही सुप्रिया सुळे यांनी आग्रह धरला आणि संजय राऊत यांच्यासोबत ठेका धरायला लावला. या वेळी वर्षा राऊत यांना मात्र फारच अवघडल्यासारखे झाले. तरीही त्यांनी डान्सचा आनंद लुटला.

व्हिडिओ

सप्ततारांकित रेनेसाँ या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या कुटुंबातील स्नेहबंध पुन्हा एकदा अधिक ठळकपणे पुढे आले आहेत.