Chhatrapati Shivaji Maharaj Park: शिवाजी पार्क मैदान नुतनीकरणावरुन शिवसेना- मनसे आमने सामनाने, आदित्य ठाकरे गंभीर, राज ठाकरे यांचे  आयुक्तांना पत्र
Raj Thackeray, Aaditya Thackeray | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवाजी पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park) मैदानाच्या जलसंचयन नूतनीकरण प्रकल्पावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS ) यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वत: यात लक्ष घातल्याने संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना, मनसे कामाला लागली आहे. त्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीच या प्रकल्पात दखल दिल्याने संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. तसेच, शिवाजी पार्य मैदानाची देखभाल करत असताना प्रतिदिन हजारो लिटर पाणी वाया जाते. हे पाणी मुंबई करांसाठी वापरता येऊ शकते. आम्हाला माहिती मिळाली आहे की, शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरु करायचा तर त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. सध्यास्थितीत महापालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची निवीदा रद्द करावी, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, मनसेला 'टाईमपास टोळी' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांचे प्रत्तुत्तर (View Tweet))

दुसऱ्या बाजूला पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क जलसंचयन प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. बुधवारी पार पडलेल्या या बैठकीत हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तातडीेन कार्यप्रणाली राबविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे विविध मुद्दे उपस्थित करुन या पक्षांमध्ये संघर्ष सुरु आहे.