मनसेला 'टाईमपास टोळी' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांचे प्रत्तुत्तर (View Tweet)
मनसेला टाईमपास टोळी म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनेक वर्षांनंतरही बाळासाहेबांचं स्मारण न बांधणं म्हणजे टाईमपास असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
मनसेला (MNS) 'टाईमपास टोळी' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनेक वर्षांनंतरही बाळासाहेबांचं स्मारण न बांधणं म्हणजे टाईमपास असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करणं याला टाइम पास म्हणतात."
दरम्यान, यापूर्वी संदीप देशपांडे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत शिवसेनेवर आरोप करत शिवसेनेचा 'विरप्पन गँग' असा उल्लेख केला होता. यात ते म्हणाले होते की, विरप्पन गँग कशी खंडणी वसुल करते याचे पुरावे मी दाखवतो. शिवसेनेकडून फेरीवाल्यांना पावती देऊन खंडणी वसूल केली जाते. त्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच यावर सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा कर, असं लिहिण्यात आलं आहे.
संदीप देशपांडे यांच्या या आरोपावर आदित्य ठाकरे यांनी मनसे ही टाईमपास टोळी असल्याचे म्हटले होते. तसंच मनसे ही संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत मग आपण का द्यावं? असंही ते म्हणाले होते. त्यावर आता मनसेने पलटवार केला आहे. (मंत्रालयाचा नवा पत्ता शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला टोला, View Tweet)
संदीप देशपांडे ट्विट:
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
दरम्यान, मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी देखील यावरुन आदित्य ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे. तर या वादात भाजपनेही उडी घेत शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. राम मंदिराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पथावरील लोकांकडून हप्ता वसूल करायचा अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2021 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

