महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला आहे. यंदा निवडणूकीमध्ये जनतेने महायुतीला कौल दिला आहे. भाजपाने 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्यावर आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी 12 च्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे. तर या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर रोजी होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? जाणून घ्या का बोलावली उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक
शिवसेना - भाजपा पक्षाने एकत्र विधानसभा निवडणूक लढली आहे. आता सत्ता स्थापन करताना दावा करण्यात आल्यानुसार 50:50 च्या फॉर्म्युल्यावरच शिक्कामोर्तब करून दोन्ही पक्ष मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री पद वाटून घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे का? शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेमध्ये आहे. वरळी मध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी; आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून अभिनंदन.
शिवसेनेला निवडणूकीला सामोरं जाताना जागा वाटपादरम्यान केलेली तडजोड, मागील पाच वर्षांत शिवसेनेला दिलेली वागणुक यावरून आता शिवसेना काय भूमिका घेणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुंबईमध्ये आज होणार्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाची नावं समोर येतात याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना शिवसेना आता काय भूमिका घेणार हे पहावं लागणार आहे. भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.