Supreme Court (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politics) आता घटनापीठ निर्णय देणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या बंडळीनंतर अनेक राजकीय घटनात्मक पेच निर्माण झाले. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात दोन सुनावण्या यापूर्वी पार पडल्या. मात्र, त्यानंतर प्रदीर्घ काळ लांबणीवर पडलेले हे प्रकरण आता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (23 ऑगस्ट) सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने हे आदेश दिले.

निवडणूक आयोगाकडे प्रलंबीत असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट) यांच्या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (25 ऑगस्ट) सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला काहीसा दिलासा मानला जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई कोणत्या वळणावर येऊन ठेपणार याबाबत पाठिमागील महिनाभरापासून उत्सुकता होती. घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग झाल्यावर ही उत्सुकता संपली. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 23 ऑगस्टला!)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर या आधी 3 आणि चार ऑगस्ट अशी दोन वेळा सुनावणी झाली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी तातडीने पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत उत्सुकता वाढत होती. अखेर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीने हे प्करण तातडीने मेन्शन करणयात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर आज सुनावणीत पार पडली. सुनावणीदरम्यान हे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग झाले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजप असे संयुक्त सरकार सत्तेत आले. सरकार सत्तेत आले असले तरी राज्यात निर्माण झालेला घटनात्मक पेच कायम आहे. त्यामुळे घटनापीठाचा निर्णय काय होतो याबाबत उत्सुकता आहे.