Mohini Jadhav | Screenshot of the video (Photo Credit: X/@inayasaba)

बदलापूर येथील आदर्श स्कूलमधील (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या वार्तांकनादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे (Waman Mhatre) यांनी पत्रकार मोहिनी जाधव (Mohini Jadhav) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. कथीत लैंगिक छळ प्रकरणानंतर नागरिकांनी केलेल्या संतप्त आंदोलनाचे वार्तंकन करण्यासाठी मोहिनी जाधव तिथे पोहोचल्या होत्या. या वेळी म्हात्रे यांनी या महिला पत्रकारास उद्देशून, 'तुम्ही असे वार्तांकरण करत आहे, जसे की, तुमच्यावरच बलात्कार झाला आहे'. धक्कादायक म्हणजे म्हात्रे हे माजी नगराध्यक्ष आहेत.

मोहिनी जाधव यांची नाराजी

मराठी माध्यमांसाठी काम करणाऱ्या मोहिनी जाधव यांनी म्हात्रे यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. म्हात्रे यांच्या विधानाबद्दल पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप करत जाधव यांनी पोलीस आणि म्हात्रे यांच्याबद्दल तीव्र नाराजी प्रसारमाध्यमांतून व्यक्त केली. आपण उद्धव ठाकरे गटासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केल्याचेही जाधव म्हणाल्या. म्हात्रे यांच्या विधानानंतर सोशल मीडिया, प्रसारमाध्यम आणि राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चौफेर टीकेचा वर्षाव होतो आहे. (हेही वाचा, Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: आदर्श विद्यामंदिर बदलापूर च्या पीडीता आणि कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई होणार; ACP Suresh Varade यांची माहिती)

वामन म्हात्रे यांची प्रतिक्रिया

पत्रकार जाधव यांनी केलेले सर्व आरोप वामन म्हात्रे यांनी फेटाळून लावले आहेत. म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य केले नाही. आपण आग्री समाजामध्ये जन्माला आलो आहोत. आपण कोणत्याही महिलेबद्दल आक्षेपार्ह भाष वापरत नाही. त्यामुळे आपल्यावर केले गेलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांना कोणताही आधार नाही. या पत्रकार आपणास भेटल्या तेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी होतो. तिथे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा आपण असे बोललो नाही. तसे काही असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत असेही म्हात्रे यांनी म्हटले. (हेही वाचा, Badlapur Sexual Assault Case HC Suo Motu: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून स्वत:हून दखल)

जाधव यांचे आरोप

काय आहे प्रकरण?

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील तीन ते चार या वयोगटातील दोन मुलींवर शाळेतीलच परिचारकानेक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेच्या फाटकासमोर आंदोलने केली तसेच काही पालक शाळा आवारा घुसले. त्यांनी शाळेतील मालमत्तेची तोडफोड केली. काही पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत रेल्वे रोको केला. ज्यामुळे बराच काळ रेल्वे ठप्प झाली.