BMC Elections 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, मित्रपक्षांबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई
Anil Desai | (Photo Credit: ANI)

BMC Polls 2022: मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत शिवसेना स्वबळावर 100 पेक्षा अधिक जागा जिंकेन असा विश्वास खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल देसाई प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. पुणे महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले आहे. याबाबत विचारले असता देसाई बोलत होते. या वेळी बोलताना देसाई म्हणाले, शिवसेना पाठिमागील अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत राहिली आहे आणि एकटीच लढत आली आहे. महाराष्ट्रात आम्ही (शिवसेना) राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासोबत महाविकासआघाडीच्या रुपात सत्तेत आहोत. दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाने घोषणा केली आहे की, पुण्यात त्यांचा पक्ष स्वबळावर लढेन. आम्ही मुंबई महापालिकेत स्वबळावर सुमारे 100 जागा एकट्याच्या बळावर जिंकत आलो आहोत.या वेळीही आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत.

मुंबई महापालिकेत प्रभागरचना बदलण्यात आली आहे. मूळच्या 227 प्रभागांमध्ये आता अधिकचे काही नवे प्रभाग अंतर्भूत करुन ही प्रभागसंख्याही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नव्या प्रभागरचनेनुसार मुंबई महापालिकेची प्रभागसंख्या 236 वर पोहोचली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा एप्रील महिन्यात होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, महाविकास आघाडी सरकार हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य; Shiv Sena आणि BJP पुन्हा एकत्र येणार नाहीत- MP Sanjay Raut)

ट्विट

दररम्यान, विद्यमान मुंबई महापालिकेत एकून 227 पैकी 97 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे 83. काँग्रेस पक्षाकडे 29 तर समाजवादी पक्षाकडे 6 नगरसेवक आहेत. मुंबईत नवख्या असलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षाकडे दोन आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडे अवघा एक नगरसेवक आहे.