Jalgaon: जळगावमधील सभेला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक; म्हणाल्या, 'मी दहशतवादी नाही'
Sushma Andhare | (Photo Credit - Facebook)

Jalgaon: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या चर्चेत आहेत. जळगावमधील सभेला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. माझ्या कारच्या पुढे 500 पोलिसांचा गराडा आहे. मी दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे मारणार तर नाही ना? असा प्रश्नदेखील सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारसह जळगाव जिल्हा प्रशासनावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज सुषमा अंधारे यांची जळगाव मध्ये सभा होती. मात्र, जळगाव पोलिसांनी त्यांना सभा घेण्याची परवानगी नाकारली आहे. सध्या सुषमा अंधारे जळगावमधील हॉटेल के पी प्राईडमध्ये नजर कैद करण्यात आले आहे. महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतरही आपण सभा घेणार असल्याचं अंधारे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सभेला जाण्याआधी पोलिसांनी कारवाई केली. (हेही वाचा - CM Eknath Shinde यांनी घेतली Breach Candy Hospital मध्ये Sharad Pawar यांची भेट; प्रकृती बद्दल दिले 'हे' अपडेट्स!)

सुषमा अंधारे यांच्यावरील कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याशिवाय मुक्ताई नगरातील 20 ते 25 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी काही आतंकवादी किंवा दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे तर मारणार नाहीत ना? खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणीही 300 ते 400 पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मी संविधानिक विचार मांडते, तरीही तुम्ही कशाल घाबरता? मी जळगाव जिल्ह्यातले प्रश्न मांडत असेल तर माझा जीव घेणार का? मी या सर्वांना तोंड देण्यासाठी खंबीर आहे, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

तथापी, गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रबोधन सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. यावेळी त्यांनी कोरोना काळात गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत व्हेंटिलेटरचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.