शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 खासदारांसह थोड्याच वेळाच रामलल्लांचे दर्शन घेणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य-ANI)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आले  असून त्यांचे  फैजाबाद विमानतळावर आगमन झाले आहे. त्याचसोबत शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांसोबत रामजन्मभूमीतील रामलल्लांचे थोड्याच वेळात दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता सर्वत्र भगवे वातावरण झालेले दिसून येणार आहे.

तर उद्धव ठाकरे अयोध्योत सहकुटुंबियांसमवेत येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी फलक आणि जागोजागी होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

(पक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती)

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात आयोध्यात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी रामलल्लांचे दर्शन सहकुटुंबियांसोबत घेतले होते. तसेच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा पवित्र रामजन्मभूमी आयोध्या येथे येणार असल्याचे म्हटले होते.