शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Photo Credits: PTI)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शुक्रवारी (14 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाबद्दल उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरुच आहे. मात्र  सरकारमधील उपमुख्यमंत्री पद रिक्त आहे. मात्र ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आमदरांना डावलून विधानपरिषदे मधील सदस्यांना मंत्रिपद देण्यात आल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.(लोकसभेच्या उपाध्यक्षपदी भावना गवळी यांची वर्णी लागणार? शिवसेना पक्षाची भाजपकडे मागणी)

परंतु शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री पद अद्याप रिक्त असल्याने अजून एकमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्यमंत्री पदासाठी जयदत्त क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत, दादाजी भुसे आणि संजय राठोड यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.