शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसैनिक आक्रमक मोडमध्ये दिसत आहेत. दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर चक्क‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. नुकतीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे. Sanjay Raut On ED Notice: ईडीचा माणूस भाजप कार्यालयात अडकला असेल; संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, दुपारी पत्रकार परिषद घेत देणार सविस्तर प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. येत्या 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut On Varsha Raut ED Notice: ईडी नोटीस हे भाजपाचं वैफल्य, वर्षा राऊत यांना नोटीस ही 10 वर्षांपूर्वीच्या व्यवहाराची: संजय राऊत
ट्विट-
#मुंबई के #ED ऑफिस पर लगे #BJP के बैनर को हटा दिया गया है @rautsanjay61 @Dev_Fadnavis pic.twitter.com/IOnwXUdABQ
— पंकज झा (@pankajjha_) December 28, 2020
दरम्यान, बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे भाजपाने थांबवावे, असे म्हणत राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. भाजपची माकडे कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचे आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका, असेही सांगितले जाते आहे. धमकावलेही जाते आहे. पण मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.