महाराष्ट्रामध्ये सध्या ईडी नोटीसांवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. काल संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार यांनी हे प्रकरण 10 वर्षापूर्वीचं असल्याचं म्हटलं आहे. एका शिक्षिका असलेल्या वर्षा राऊतांनी घर खरेदीसाठी मैत्रिणीकडून 50 लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचा उल्लेख राज्यसभा खासदारकीच्या वेळेस अॅफिडेव्हिटमध्ये केले आहे. मग आता 10-12 वर्षांनी ईडीला त्याची आठवण कशी झाली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी बोलताना भाजपावर प्रखर हल्लाबोल केला आहे. 100 वेळा नोटीशा पाठवल्या तरीही घाबरत नसल्याच म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे 3 नेते ईडी कार्यालयात जातात. जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पाडता येत नाही, राजकीय दबावाने विषय संपवू शकत नाहीत तेव्हा आता राजकीय सुडबुद्धीने ईडी, सीबीआय सारखी हत्यारं उपसली जात आहेत. मात्र मुलं, बायका यांच्या आडून हल्ला करणारे हे विरोधक नामर्द आहेत असा घणाघात करताना ईडी भाजपाचा पोपट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळेस 120 भाजपा आमदारांची यादी तयार आहे. राऊत कुटुंबाची संपत्ती भाजपा नेत्यांप्रमाणे 1600 पटांनी वाढत नाही. मला तोंड उघडायला लावू नका. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाली आहे त्यामुळे त्याला उत्तर देखील राजकीय पद्धतीनेच दिलं जाईल. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. यासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाऊन देईल असे देखील म्हटले आहेत. Sanjay Raut Tweets: पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिले 'हे' आव्हान.
Targetting women of a household is an act of cowardice. We are not scared of anyone and will respond accordingly. ED needed some papers and we have submitted them in time: Shiv Sena MP Sanjay Raut https://t.co/HmYP2Fua9Y
— ANI (@ANI) December 28, 2020
महाविकास आघाडी सरकारचे जे खंदे समर्थकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केलं आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही असे पुन्हा म्हणाले आहेत. आज सेना भवनातील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्यासोबत प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते. दरम्यान वर्षा राऊत ईडी चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात जाणार की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.