शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. येत्या 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. यांसदर्भात संजय राऊत यांना विचारला असता या प्रकरणाची माहिती घेऊन पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देईल, असे संजय राऊत म्हणाले होते. नुकतेच संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, 'आ देखें जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया'. ईडी चौकशीवरूनच संजय राऊत यांनी हे ट्विट केले आहे, असे म्हंटले जात आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले आहेत. हा व्यवहार कसा झाला? त्यामागील कारण काय आहे? हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- UPA President: 'यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये' काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले
संजय राऊत यांचे ट्विट-
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020
एकनाथ खडसे यांना ईडी नोटीस आल्यानंतर संजय राऊत आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, ते म्हणाले होते की, आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनाही 'ईडी'च्या नोटिसा आल्या आहेत. जे तुमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्ही ज्यांच्याशी राजकीय सामना करू शकत नाहीत, अशा लोकांना तुम्ही 'ईडी', 'सीबीआय', 'इन्कम टॅक्स' अशा बळाचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते होणार नाही,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.