शिवसेना (Shiv Sena)युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज शिवसेना बंडखोर आणि एकनाथ शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्या मतदारसंघात जोरदार सभा घेतली. या सभेला शिवसैनिक आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही गर्दी सर्वांचेच लक्ष्य वेधून घेणारी होती. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि शिंदेसमर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, अनेक अपेक्षा ठेऊन गद्दार शिवसेनेतून बाहेर गेले. त्यांनी सरकारही स्थापन केले पण मला त्यांना विचारले हे सगळं करुन तुम्हाला काय मिळाले? बाबाजी का ठुल्लू? आदित्य ठाकरे यांच्या या विधानाला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा सध्या चौथा टप्पा सुरु आहे. आज ते गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात होते. गुलाबराव पाटील हे शिवसेना तिकीटावर निवडून आलेले आमदार आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. या वेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आज अनेक लोक आपल्याला सोडून गेले. पण तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारताच मोठ्या प्रमाणावर 'नाही' असा आवाज आला. दरम्यान, आगामी निवडउणुकीत गद्दारांना धडा शिकवा असेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; आगामी BMC निवडणूक जिंकण्याचा केला दावा)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घेतलेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या वेळी मोठा पाऊस असतानाही शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. या गर्दीला उद्देशून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले राज्यातील जनात सुज्ञ आहे. त्यांना खरे खोटे कळते. जे विकावू होते, गद्दार होते ते शिवसेनेला सोडून गेले. पण जे निष्ठावान होते ते मात्र कायम राहिले. गद्दारांनी बेकायदेशीरपणे सरकार स्थापन केले आहे. परंतू हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.