Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी यावेळी आगामी बीएमसी निवडणूक (BMC Election) जिंकणार असल्याचा दावा करत विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेनेवर घणाघाती टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, लोकांनाही बसू देणार नाहीत. यावेळी बीएमसीवर भाजप आणि खरी शिवसेना भगवा फडकवतील."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "आम्हाला मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. येत्या काही महिन्यांत आम्हाला खूप मेहनत करायची आहे. मुंबई महापालिका सध्या भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेली आहे. महापालिका यातून मोकळी करावी लागेल. मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्यांसाठी कोणतेच काम झाले नाही. निवडणूक जवळ आली की, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असं म्हटलं जातं. मुंबईला महाराष्ट्रापासून कोण वेगळ करत आहे? असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. (हेही वाचा - CM On Uddhav Thackeray: दहीहंडीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले - आनंद दिघेंची इच्छा आता पूर्ण झाली)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, तुम्ही दिल्लीपुढे झुका, सोनिया गांधींपुढे नतमस्तक व्हा, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही दिल्लीला जाऊ. मुंबई महाराष्ट्राशिवाय कोणाच्या बापाची नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप करेल.