Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रामध्ये अद्यापही कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर गेलेले नाही. त्यामुळे यंदा 19 फेब्रुवारीला साजरी होणारी शिव जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करावी असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. दरम्यान त्यांनी शासकीय प्रोटोकॉल नुसार शिवजयंती निमित्त सरकार कडून राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यंदा शिवजयंतीला (Shiv Jayanti) शिवनेरी (Shivneri) वर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मार्च 2020 पासून राज्यात कोरोना वायरसचं संकट घोंघावत आहे. या संकटाचा सामना करताना सरकारच्या आवाहनाला नेहमीच जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे. राज्यात लसीकरण मोहिम सुरू झाली असली तरीही संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे यंदाची 19 फेब्रुवारीची शिव जयंती देखील साधेपणाने साजरी करावी असं त्यांनी आवाहन केले आहे. दरम्यान आज अजित पवार यांनी पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव बद्दल एक आढावा बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान काल राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवनेरी किल्ल्याच्या विकासकामांबाबत आढावा घेतला आहे. शिवनेरी किल्ल्याची दुरुस्ती, आई शिवाई देवी मंदिराची पुनर्बांधणी, जन्म स्थळाचे पुनरुज्जीवन अशी कामे यंदाच्या शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करण्यात आली आहेत.