Representational Image (Photo Credits: File Image)

पुणे पोलिस (Pune Police) दलातील गुन्हे शाखेतील (Crime Branch)  सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेले नाही. पण राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवलं आहे.

आज (31 डिसेंबर) विश्रांतीवाडी परिसरामध्ये आपल्या घरातच शिल्पा चव्हाण यांनी जीवन संपवलं. गुन्हे शाखेत काम करण्यापूर्वी त्या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत काम करत होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी आल्या होत्या. मात्र अचानक त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिस दलाला धक्का बसला आहे. Pune Suicide: पुण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू .

शिल्पा चव्हाण यांच्या घरी त्यांचा स्टाफ त्यांना आणण्यासाठी गेला असताना शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा घरी कोणीच नव्हते. त्यांचा मुलगा गावी गेला होता. पोलीस दलात काम करत असलेल्या शिल्पा चव्हाण या कामात अत्यंत सर्तक अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. पोलिस दलात त्यांची ओळख अत्यंत संयमी व प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.